EVENTS
flower decoration
banquet decoration
Full entertainment
VALET PARKING
CCTV Surveillance
EXTENDABLE TIMING
ब्राम्हण सहाय्यक संघ
ब्राम्हण सहाय्यक संघ, शिक्षणमंत्री दादासाहेब रेगे मार्गावर -दादरच्या मध्यवर्ती भागात 1935 पासून कार्यरत असलेली एक संस्था.
संस्थेची वातानुकूलित,सुरेख पण दर्जेदार सजावटीने,अद्ययावत् सुखसोयींनी सज्ज असलेली दोन सभागृहे ,विवाह,मौजीबंधन,वाढदिवस इ.मंगलकार्यांसाठी भाड्याने दिली जातात.साधारण 300/400 क्षमता असलेली ही सभागृहे पंचाहत्तरी,साठी समारंभ,मेहंदी समारंभयासाठीही उपलब्ध असतात.
अगदी 40/50लोकांसाठी मोठी सभागृहांची आवश्यकता नसेल तर मधे पार्टिशन घालून तेवढ्या उपस्थितांची सोयही सर्वांना परवडेल असे भाडे आकारून केली जाते.अर्ध्यादिवसासाठीही सभागृहे उपलब्ध असतात.
पार्किंगचा प्रश्नही आता संस्थेने सोडविला आहे.हवे असल्यास सशुल्क Valet Parking ची सोयही संस्था करते.वधूवराच्या प्रत्येकी दोन गाड्यांचे parking संस्थेच्या आवारात उपलब्ध आहे.
संस्थेमध्ये सजावटीसाठी ठेकेदाराची सोय संस्थेने केली आहे.मात्र केटरर तुमच्या पसंतीचा तुम्ही आणू शकता.केटरिंगची monopoly नाही.
तेंव्हा आता तुमच्याकडील मंगलकार्यासाठी ब्राम्हण सहाय्यक संघाची सभागृहे अनेक सुविधांसह उपलब्ध आहेत .सभागृहे भाड्याने आरक्षित करण्यासाठी जातीचे बंधन नाही.
सभासदांना सभागृहाच्या प्रत्येक मजल्याच्या भाड्यात 5,000 ₹ सवलत आहे.दोन्ही मजले घेतल्यास 10,000 ₹ सवलत आहे.सभासदांना मंगलकार्याच्या एक वर्ष आधी सभागृह आरक्षित करता येते. सभासद नसलेल्यांना दोन्ही सभागृहे आरक्षित केल्यास कार्याच्या तारखेच्या नऊ महीने आधी सभागृह आरक्षित करता येते.
अशी ही ब्राम्हण सहाय्यक संघाची वातानुकूलित,अद्ययावत सुखसोयींनी युक्त सभागृहे आरक्षित करून आपल्या पाहुण्यांची दाद मिळवा.